शहर परिसराला वळीवाने झोडपले

0
1
Rain
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या काही दिवसात उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना वळिवाच्या पावसाने दिलासा दिला असून आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहर परिसरात धुव्वाधार पाऊस बरसला आहे.

तब्बल दीड तासांहून अधिक काळ कोसळणाऱ्या पावसाने बेळगावकरांची त्रेधातिरपीट उडाली. अशातच आज शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आयोजित करण्यात आली असून या मिरवणुकीवर देखील पावसाचे सावट पसरले आहे.

दरम्यान, ठिकठिकाणी नागरिक अडकून पडल्याचे चित्र होते. आज शनिवार हा बाजाराचा मुख्य दिवस असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची दैना उडाली. ठिकठिकाणी गटारी भरून पाणी बाहेर पडल्याने रस्त्यावर दूषित पाणी वाहत होते.

 belgaum

आज बरसलेल्या पावसामुळे वाहतूक देखील काही काळ ठप्प झालेली दिसून आली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांनी दुकानांच्या कट्ट्यावर, पायरीवर आसरा शोधला. विजांच्या प्रचंड गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.Rain

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील दक्षिण आणि उत्तरेकडील भागात येत्या १४ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे.

पावसाने बेळगाव शहरातील मुख्यतः बाजारपेठेत अनेक जणांची त्रेधापिठ उडाली होती पांगुळ गल्ली भेंडी बाजार भोई गल्ली परिसरातील अनेक दुकानात पाणी शिरले होते विशेषता झेंडा चौक मार्केट मध्ये देखील मार्केट रस्त्यावर पाणी साचले होते. पांगुळ गल्ली भेंडी बाजार आणि भोई गल्लीतील गटारी नेहमीप्रमाणे तुंबल्या होत्या. गटारीचे पाणी रस्त्यावर वाहून जात होते. भेंडी बाजार सर्कलमध्ये झाड देखील कोसळले होते मात्र त्यांनी कुणाचे नुकसान झाले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.