Tuesday, December 24, 2024

/

बेळगावला मिळणार 50 पर्यावरण पूरक नव्या इलेक्ट्रिक बसेस

 belgaum

बेळगाव लाईव्ह :टाइम्स ऑफ इंडियाने लवकरच 50 नवीन इलेक्ट्रिक बसेसच्या आगमनाची बातमी दिल्याने बेळगाव आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्याच्या मार्गावर आहे. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेआरटीसी) प्रवाशांना आलिशान आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हुबळी-धारवाड आणि बेळगाव येथे 350 हून अधिक इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी पावले उचलत आहे.

महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करणाऱ्या शक्ती योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद म्हणून एनडब्ल्यूकेआरटीसीने या इलेक्ट्रिक बसेससाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) मॉडेल अर्थात एकूण खर्चाचा करार नमुन्यांतर्गत निविदा प्रक्रिया सुरू केली असून जी आता अंतिम टप्प्यात आहे.

डिझेल बस उत्सर्जनाशी संबंधित आरोग्याचे धोके कमी करण्याच्या आणि शहरी हवेची गुणवत्ता वाढवण्याच्या इच्छेने महामंडळाला इलेक्ट्रिक बसेसकडे वळण्यास प्रेरित केले आहे. इलेक्ट्रिक बसेस ‘शून्य’ उत्सर्जन आणि चालविण्यायोग्यता, देखभाल आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करतात.

सध्या एनडब्ल्यूकेआरटीसी डिझेल बसेसवर 48 रुपये प्रति किलोमीटर खर्च करते. नवीन ई-बस सेवा कमी खर्चात कार्यान्वित करू शकल्यास त्याचा फायदा महामंडळाच्या आर्थिक स्थितीला तर होईलच शिवाय प्रवाशांच्या सेवेचा दर्जाही सुधारणार आहे. इलेक्ट्रिक बसेस शहरी आणि आंतरशहर दोन्ही मार्गांवर सेवा देतील. एनडब्ल्यूकेआरटीसी कडून 150 बसेस शहरी भागात वाटप केल्या जातील. त्यापैकी हुबळी-धारवाडमध्ये 100 आणि बेळगावमध्ये 50 कार्यरत राहतील. याखेरीज हुबळी आणि बेळगावला शेजारच्या शहरांना जोडणाऱ्या 200 बसेस असतील.Nwkrtc

जीसीसी मॉडेल अंतर्गत, नॉन-एसी ई-बस खरेदी करणे, चालवणे आणि देखरेखीसाठी सेवा प्रदाते जबाबदार असतील. त्यांना एनडब्ल्यूकेआरटीसीद्वारे प्रदान केलेल्या नियुक्त ठिकाणी चार्जिंग सुविधा स्थापित करणे. तसेच बस चालकांची व्यवस्था देखील करावी लागणार आहे. एनडब्ल्यूकेआरटीसी बस वाहकांचा पुरवठा करेल आणि प्रति किलोमीटरसाठी एक निश्चित किंमत देईल.

निवडलेल्या सेवा प्रदात्याने कराराच्या 6 महिन्यांच्या आत चार्जिंग स्टेशनसाठी तीन स्थाने शोधून आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक जाळ्याचे आधुनिकीकरण आणि हरितकरण करण्याच्या उद्देशाने ई-बस करार 10 वर्षांचा असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.