Monday, December 30, 2024

/

अपघाताला निमंत्रण देणारे ठरताहेत ‘या’ चौकातील सिग्नल

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :बेळगाव शहरातील गोवावेस अर्थात संत श्री बसवेश्वर सर्कलच्या ठिकाणची व्यवस्थित बसवली नसलेली सिग्नल व्यवस्था अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

या सिग्नलच्या ठिकाणी येऊन मिळणारा शहापूर महात्मा फुले रोड हा दुपदरी रस्ता आणि वडगावकडून येणारा रस्त्यासाठी असणारे सिग्नल एकाच बाजूला असल्यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे.

परिणामी बऱ्याचदा या दोन्ही रस्त्यावरील वाहने आपलाच सिग्नल पडला आहे असे समजून एकाच वेळी चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. परवाच एक दुचाकी चालक बसवेश्वर चौकातील सिग्नल पडल्यामुळे महात्मा फुले रोडवरून आरपीडीच्या दिशेने निघाला होता. मात्र त्याच वेळी वडगाव करून येणाऱ्या टेम्पो चालकाने आपलाच सिग्नल पडला आहे असे समजून आपला टेम्पो पुढे दामटवला. परिणामी आरपीडी क्रॉसकडे निघालेल्या दुचाकी चालकाला टेम्पोची धडक बसणार होती.

मात्र दैव बलवत्तर म्हणून तो दुचाकी चालक बचावला. गोंधळात टाकणाऱ्या बसवेश्वर सर्कल येथील सिग्नल व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका तर वाढलाच आहे, शिवाय सिग्नल पडलेला नसतानाही आपलाच सिग्नल पडला आहे असे समजून वाहने पुढे दामटणाऱ्या वाहन चालकांकडून अनावधानाने नकळत वाहतूक नियमांचा भंग होत आहे.

बसवेश्वर सर्कल येथील महात्मा फुले रोड आणि वडगावकडून येणाऱ्या वाहनांसाठीचे सिग्नल एकाच बाजूला बसविण्यात आल्यामुळे हे सर्व घडत आहे. एकाच बाजूला दोन्ही रस्त्यांचे सिग्नल असल्यामुळे विशेष करून वयस्क वाहन चालक गोंधळात पडत आहेत.

तेंव्हा रहदारी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादा गंभीर अपघात घडण्यापूर्वी बसवेश्वर सर्कल येथील महात्मा फुले रोड आणि वडगावकडून येणाऱ्या रस्त्यासाठी असणारे सिग्नल सामान्यातील सामान्य माणसाला समजतील अशा योग्य ठिकाणी बसवावेत अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.