Tuesday, January 14, 2025

/

लेंडी नाल्याचा बांध फुटून 3 लाखाच्या मिरची पिकाचे नुकसान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसराला नुकत्याच झोडपलेल्या मुसळधार पावसामुळे समर्थनगरनजीक तुडुंब भरलेल्या लेंडी नाल्याचा बांध फुटून शेतात शिरलेल्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याच्या मिरची पिकाचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नांव युवराज गजानन सावंत असे आहे. यंदा आधुनिक पद्धतीने मिरची उत्पादन काढतो असे घरच्यांना सांगून त्यांनी समर्थनगर नजीक लेंडी नाल्या शेजारी असलेल्या आपल्या शेतातील एक एकरमध्ये 3 लाख रुपये खर्चून मिरची पिकाची लागवड केली होती.

सदर पिकाला आता फुलं देखील धरू लागली होती. मात्र दुर्दैवाने परवा सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे समर्थनगर जवळ लेंडी नाल्याचा जवळपास 20 फुटाचा बांध फुटून सावंत यांच्या शेतातील संपूर्ण मिरची पीक पाण्याखाली जाऊन मातीमोल झाले आहे.

यामुळे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदर पीक हाती आले असते तर मिळणाऱ्या जवळपास 5 -6 लाखांनाही युवराज सावंत यांना मुकावे लागले आहे.Crop loss

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना युवराज यांचे काका शेतकरी नेते नारायण सावंत यांनी लेंडी नाल्याच्या मधल्या कांही राहिलेल्या भागाची गाळ काढून स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परवाच्या मुसळधार पावसाचे पाणी तुंबून नाल्याचा बांध फुटण्याद्वारे जवळपास 100 एकर जमिनीतील शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती दिली.Sambra yatra

ते म्हणाले की, हा नाला पुढे बळळारी नाल्याला जाऊन मिळतो. तत्कालीन आमदार ॲड. अनिल बेनके यांच्याकडे पाठपुरावा करून त्यावेळी लेंडी नाल्याचा पुढचा जवळपास 1 कि.मी. अंतराचा भाग आम्ही स्वच्छ करून घेतला आहे. मात्र मधला भाग स्वच्छ करावयाचा राहिला आहे. त्या ठिकाणीच मुसळधार पावसाचे पाणी तुंबून नाला ओव्हर फ्लो होण्याद्वारे समर्थनगर जवळील नाल्याचा 20 फुटाचा बांध फुटून पाणी शिवारांमध्ये घुसले आहे.

या पद्धतीने शिवारात नाल्याचे पाणी शिरण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास पुढील पिकासाठी म्हणजे भात पेरणीसाठी शिवार उपलब्ध होणार नाही. याखेरीज पाणी तुंबल्याने शेतातील आरोग्य स्वच्छतेचे सूत्र बदलले, खराब झाले आहे.Sambra yatra

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करणे कठीण जाणार असल्याचे सांगून युद्धपातळीवर लेंडी नाल्याच्या शिल्लक असलेल्या भागाची स्वच्छता केली जावी. तसेच नाल्याच्या पुरामुळे नुकसान झालेल्या युवराज सावंत यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नारायण सावंत यांनी केली.Sambra yatra

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.