बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शनिवारी दि. 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हिंडलगा, बेळगाव येथील हुतात्मा स्मारक येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मराठी भाषिकांनी बहुसंख्येने हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही कर्नाटक सरकारची दडपशाही आणि अत्याचार सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून पुन्हा एकदा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत होण्यासाठी 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकानी हुतात्मा स्मारक येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
*१ जून गांभीर्याने पाळा, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा*
खानापूर म.ए.समितीचे आवाहन
1986 मध्ये कर्नाटक सरकार तर्फे मराठी भाषिकवर कन्नड सक्ती लादली होती या विरोधात संपूर्ण सीमा भागात तीव्र संताप पसरला होता या कन्नड सक्ती विरोधात सीमा भागातील मराठी तरुणाने एकत्रित येऊन आंदोलन आपल्या हाती घेतले होते या आंदोलनात कर्नाटक सरकारने गोळीबार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निष्पाप मराठी तरुणांचे जीव घेतले होते त्या दिवशीपासून संपूर्ण सीमा भागातील जनता एक जून हा हुतात्मा दिन म्हणून गांभीर्याने पाळत आलेली आहे यावर्षी सुद्धा सीमा भागातील संपूर्ण मराठी भाषिकांनी एक जून गांभीर्याने पाळून कडकडीत हरताळ करावे या एक जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री सुयाजी पाटील व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष श्री धनंजय पाटील यांनी केले
यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील,युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,माजी तालुका सभापती सुरेश देसाई, नंदगड दक्षिण विभाग सोसायटीचे अध्यक्ष पी.एच. पाटील,लक्केबैल पिकेपीएस चे माजी अध्यक्ष रवी पाटील, दत्तू कुट्रे व राजू पाटील उपस्थित होते.