बेळगाव लाईव्ह : शिवजयंती उत्सवानिमित्त शनिवार दि. ११ मे रोजी आयोजिण्यात आलेल्या चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये दारू विक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था बेळगाव शहर यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.
११ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून १० मे रोजी सायंकाळी ६.०० ते १२ मे रोजी सकाळी ६ पर्यंत मद्यविक्री दुकाने, बार/रेस्टॉरंट साठी क्लब आणि स्टॉक डेपोमधून पुरवठा थांबविण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
दारूची दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये विक्री आणि वाहतूक करण्यास मनाई आहे. दारूची दुकाने आणि केएसबीसीएल डेपो, हॉटेलमधील बार बंद करून सर्व अबकारी दुकाने बंद करून सील करण्याची सूचना परीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.