बेळगाव लाईव्ह : देशपातळीवरील राजकारणासह राज्य आणि स्थानिक पातळीवरही सातत्याने उलथापालथ होत असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक जेडीएसचे हासन मतदार संघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील सीडी प्रकरण बाहेर पडले.
या प्रकरणी भाजप आणि जेडीएस नेत्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर ठपका ठेवत या प्रकरणामागे त्यांचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान आपल्यावर होत असलेल्या आरोपासंदर्भात डी. के. शिवकुमारांनी प्रदरमाध्यमांना प्रतिक्रिया देताना या संदर्भात अधिवेशनात चर्चा रंगेल असं विधान केलंय.
माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांनी राजभवनात भेट देऊन प्रज्वल प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे यासाठी लढा देण्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना डी. के. शिवकुमारांनी कुमारस्वामींवर पलटवार केला.
कुमारस्वामींना आंदोलन करण्यापासून कोणी रोखले नाही किंवा आडकाठी केली नाही. त्यांना वाटत असेल तर त्यांनी जरूर आंदोलन करावे, निवडणूक प्रचारासाठी आपण आंध्रप्रदेशमध्ये जात आहोत, तिथून परतल्यानंतर या प्रकरणी नक्की प्रतिक्रिया देऊ असं विधान डी. के. शिवकुमारांनी केलं.
शिवाय पेनड्राइव्ह प्रकरणी आपल्याला विनाकारण अडकवण्यात येत असून यासंदर्भात आपली भूमिका आधीच स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.