बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये व्हेगा ग्रुप धोबी घाट नाल्याच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व करत असून जो स्थानिक जलसंधारणाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्यास फाऊंडेशनने धोबी तलाव येथे नव्याने बांधलेल्या तलावातील पाण्याचा प्रवाह सुधारण्याद्वारे त्याचे निरंतर चैतन्य आणि महत्त्व समाजामध्ये सुनिश्चित करणे हे आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंटचे नेतृत्व स्वीकारल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजीव कुमार यांनी प्रदेशातील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
या उपक्रमांमध्ये पडीक विहिरी आणि बोअरवेल्सचे पुनर्संचयित करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि पावसाच्या पाण्याची साठवण प्रणालीची व्यापक अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
आपल्या सक्रिय दृष्टिकोनाची सुरुवात त्यांनी स्वतःच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयाच्या आवारात जलपुनर्भरण अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण (वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम) बसवण्याद्वारे शाश्वत पद्धतींसाठी एक मानक स्थापित केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांनी आपल्या जलसंवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था, जलसंधारण संस्था, स्वयं-मदत गट आणि व्यवसायांसोबत भागीदारी वाढवली आहे.
या सहयोगी दृष्टिकोनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याकडे समुदायासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते. विहिरी व बोअरवेल्सची देखभाल आणि त्यांना पुनर्संचयित करण्यास प्राधान्य हे कॅन्टोन्मेंट प्रदेशातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण अधोरेखित करते.
ज्यामुळे रहिवाशांसाठी विश्वसनीय पाणीपुरवठा सुनिश्चित होतो. धोबी घाट नाल्याचे पुनरुज्जीवन आणि संबंधित प्रकल्प हरित व अधिक शाश्वत बेळगाव निर्मितीची वचनबद्धता दर्शवतात.