Monday, December 23, 2024

/

रेल्वेत चाकू हल्ला एकाचा खून तर दोघे जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :धावत्या रेल्वेमध्ये तिकिटाची विचारना करणाऱ्या तिकीट तपासनीस सह दोघांवर एका प्रवाशाने धारदार चाकूने हल्ला करून तपासणीसासह दोघेजणांना जखमी करण्याबरोबरच एका कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याचा छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना लोंढा ते गुंजी दरम्यान आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

चाकू हल्ल्यात ठार झालेल्या रेल्वे कर्मचारी युवकाचे नांव देवर्षी (वय 22, रा. झांशी) असे आहे. तो रेल्वेमध्ये प्रवाशांना अंथरून देणारा बेडरोल कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. जखमींमध्ये तिकीट तपासणी अश्रफ कित्तूर् आणि कंत्राटी रेल्वे कर्मचारी शोएब शेख यांचा समावेश आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तिकीट तपासणी अश्रफ हे दुपारी हुबळीहून पांडेचेरीला निघालेल्या रेल्वे क्र. 11006 मध्ये नेहमीप्रमाणे आपले तिकीट तपासणीचे काम करत होते. यावेळी लोंढा ते गुंजी दरम्यान स्लीपर क्लासमध्ये तपासणी करताना त्यांनी दरवाजाजवळ थांबलेल्या सात -आठ प्रवाशांना तिकिटाची विचारणा केली. त्यांच्यापैकी चौघा जणांकडे तिकीट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर अश्रफ यांनी त्यांना दंड घातला. त्यानंतर पुढे येऊन त्यांनी शेवटी दरवाजा थांबलेल्या प्रवाशाकडे तिकिटाची विचार नाही केली. त्यावेळी मला तिकीट विचारतोस का असा जाब विचारून त्या प्रवाशाने अश्रफ यांच्यावर अचानक लांब धारदार चाकूने हल्ला चढवला.Tc railway

चाकू पोटाला लागणार हे लक्षात येताच क्षणार्धात प्रसंगावधान राखून अश्रफ मागे सरकले मात्र तरीही त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला चाकूचा वार झाला. अश्रफ वाचताच जवळच थांबलेला बेडरोल कर्मचारी देवर्षी हा तिकीट तपासणी साहेबांचा माणूस आहे असे समजून त्या हल्लेखोर प्रवाशाने आपला चाकू थेट देवर्षी याच्या छातीत खूपसला. त्यामुळे देवर्षी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. दरम्यान हल्लेखोर प्रवाशाने रेल्वेतून उडी टाकून घटनास्थळावरून पलायन केले. सदर सदर घटने प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस हल्लेखोर प्रवाशाचा शोध घेत आहेत.

साधारण सायंकाळी ४ च्या सुमारास हि घटना घडली असून हल्लेखोराकडे तीक्ष्ण चाकू असल्याचीही माहिती पुढे आली आहे. रेल्वेमध्ये झालेल्या या भयानक प्रकारानंतर बेळगावमध्ये खळबळ माजली असून रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान बेळगावचे पोलीस आयुक्त
मार्टिन यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत जखमी टीसी व इतरांची चौकशी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.