Friday, January 3, 2025

/

चिक्कोडीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रात असणार दोन बॅलेट युनिट्स

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने येत्या 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने अतिरिक्त भार उचलण्याची अपेक्षा आहे. निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे येथील प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त बॅलेट युनिट आवश्यक असणार आहे.

निवडणुकीसाठीचे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) हे बॅलेट युनिट व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपीएटी) आणि कंट्रोल युनिट अशा तीन घटकांचा समावेश असतो. बॅलेट युनिटमध्ये मतदार मतदान करतात. व्हीव्हीपॅट अतिरिक्त पारदर्शकता प्रदान करते ज्यामुळे मतदारांना त्यांची मते इच्छेनुसार टाकली आहेत याची पडताळणी करता येते.

कंट्रोल युनिट हे मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करते, जे ईव्हीएमच्या इतर घटकांचे समन्वय आणि नियंत्रण करते. प्रत्येक बॅलेट युनिट हे फक्त 16 उमेदवारांची नावे सामावून घेऊ शकते परिणामी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे निवडणूक आयोगाला उर्वरित दोन उमेदवारांसाठी आणखी एक अतिरिक्त बॅलेट युनिट आणि नोटा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये 1,896 मतदार केंद्रे असून यापैकी 419 शहरी भागात आणि 1,477 ग्रामीण भागात आहेत. सर्वाधिक 260 मतदान केंद्रे निपाणी विधानसभा मतदारसंघात असून सर्वात कमी म्हणजे 219 केंद्रे कुडचीमध्ये आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे निवडणूक आयोग 3,784 बॅलेट युनिट्सचा वापर करणार आहे. या संदर्भात बोलताना निवडणूक अधिकारी व जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, आम्हाला यापूर्वीच मतदार संघासाठी आवश्यक बॅलेट युनिट्स मिळाले असून आम्ही त्यांचे वाटपही केले आहे.

त्याचप्रमाणे आम्हाला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी शेकडा 20 टक्के अतिरिक्त ईव्हीएम मशीन्स मिळाली आहेत. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच ईव्हीएम मशीन्सवर मतदानाची यादृच्छिकपणे चांचणी देखील घेतली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.