बेळगाव लाईव्ह :शिक्षण खात्याने नव्याने शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात नवीन शिक्षक भरतीसाठी येत्या 30 जून 2024 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी डीएड व बीएड धारकांना 15 मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.
शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे डीएड् आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी 15 मे 2024 पर्यंत अर्ज दाखल करावेत. गेल्या कांही महिन्यांपासून राज्यात शिक्षकांच्या 13,500 जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
त्या अंतर्गत आतापर्यंत 15 टक्के शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून ते विविध शाळांमध्ये सेवेत रुजू झाले आहेत. तथापि सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक भरतीसंदर्भात इच्छुकांसाठी शिक्षण खात्याच्या http://schooleducation.karnatka.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याची नोंद घेऊन शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार डीएड् व बीएड् धारकांनी अर्ज दाखल करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे