बेळगाव लाईव्ह : मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असणाऱ्या रमजान ईद निमित्त बेळगावमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन गुरुवारी शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण केले.
रमजान ईद निमित्ताने पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी सामुदायिक नमाज झाल्यानंतर एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरात बनविल्या जाणाऱ्या शिरखुर्म्यासाठी दूध, शेवया आणि सुकामेव्याची मागणी वाढली होती.
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिन्याचे उपवास बुधवारी समाप्त झाले. गुरूवारी अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात ईदचा सण साजरा करण्यात आला.
ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाजपठणावेळी मुस्लिम समाजातील नेते, मान्यवर आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ईदनिमित्ताने मुस्लिम समाजबांधवांनी गळाभेट घेत ईद मुबारकच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.