बेळगाव लाईव्ह: बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केलेली टीका बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांना भोवल्याची चिन्हे दिसत आहेत. त्या वक्तव्या विरोधात शनिवारी रात्री आदर्श नगर वडगाव येथील संजय पाटील यांच्या घरासमोर शेकडो काँग्रेसच्या महिला निदर्शने आंदोलन केले आहे.
हिंडलगा येथे शनिवारी भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात टीका करताना बेळगाव ग्रामीण मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणे महिला एकत्र आल्या आहेत. त्यामुळे मंत्री हेबाळकर यांना धडकी भरली असून त्यांना रात्री झोप लागणार नाही. माजी मंत्री रमेश जारकी होळी आज आमच्या व्यासपीठावर असल्यामुळे त्यांना एक पेग जास्तीच घ्यावा लागणार अशा शब्दात टीका केली होती.
या वादग्रस्त टीकेवर मंत्री हेबाळकर यांनी सोशल मीडियावर म्हणणे व्यक्त केले आहे. संजय पाटील यांनी केवळ माझा अपमान केला नाही तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि विद्यमान खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या त्यामुळे त्यांनी हा प्रकार रोखणे आवश्यक होते पण ते सुद्धा या टीकेला हसून दाद देत होते. यातून भाजपची मानसिकता समोर येत असून लोक मतदानातून त्यांना चोख प्रत्युत्तर देतील, असा आरोप केला होता
या घडामोडीनंतर माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्यामध्ये समस्त महिलांचा अपमान झाला आहे असा आरोप करत शेकडो महिलांनी शनिवारी रात्री संजय पाटील यांच्या घरासमोर निदर्शने आणि आंदोलन केले माजी आमदार संजय पाटील यांच्या प्रतिकृतीला काळे देखील फासले आहे.
माजी आमदार संजय पाटील यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली आहे. संजय पाटील यांनी घरातून बाहेर यावं आणि माफी मागावी अशी मागणी केली.यावेळी काँग्रेसच्या महिला नेत्या प्रभावती मास्तमर्डी आयेशा सनदी आदी सहभागी होत्या.
दरम्यान रात्री 11 पर्यंत महिला काँग्रेस महिला कार्यकर्त्या आंदोलन सुरूच होते जोवर माजी आमदार माफी मागत नाहीत तोवर आंदोलन निदर्शने सुरूच राहतील अशी भूमिका महिला आंदोलन कर्त्यानी घेतली आहे.