बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवार दि. 28 एप्रिल 2024 रोजी बेळगावला भेट देणार आहेत.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारील मालिनी सिटी येथे होणाऱ्या मेळाव्यात पंतप्रधान मोदी भाग घेणार आहेत अशी माहिती भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
रविवारी 28 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र आदींसह बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी हजेरी लावणार असल्याचेही माजी आमदार बेनके यांनी सांगितले.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चिकोडी त होणार असल्याचे बोलले जात होते मात्र अखेर मोदींची सभा बेळगावात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावात आले होते आणि त्यांची सभा मालिनी सिटी येथे झाली होती त्यांनी जवळपास 15 किलोमीटरचा रोड शो बेळगावात केला होता. आता लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यासाठी नरेंद्र मोदी बेळगावतून बॅटिंग करणार आहेत.