बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी (दि.15) जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे जगदीश शेट्टर हे ६८ वर्षांचे असून त्यांनी कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड मधून एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
शेती आणि वकिली असे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांनी २४ कोटींहून अधिक मालमत्ता स्वतःच्या नावावर तसेच पत्नीच्या नावावर ९२ लाखांहून अधिक मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. याव्यतिरिक्त ५७ लाखांहून अधिक दायित्व असल्याचेही जाहीर केले आहे.