Saturday, January 25, 2025

/

आचारसंहिता भंग केल्यास होणार ‘अशी’ कारवाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रचार कार्यक्रमाचे व्यासपीठ आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांसोबत शेअर केल्यास त्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च उमेदवाराच्या खर्चात जमा केला जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी (दि.२३) बेळगाव लोकसभा मतदार संघाचे सर्वसाधारण निरीक्षक व खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिर, मशीद, चर्च यांसह कोणत्याही धार्मिक स्थळी निवडणुकीचा प्रचार करू नये. असे प्रकार आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणत्याही अध्यापन संस्थेमध्ये प्रचाराचे काम करायचे असल्यास संबंधित संस्थेची अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे.

 belgaum

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक सार्वजनिक भेटीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत काही तक्रारी किंवा त्रुटी आढळून आल्यास त्याची माहिती निरीक्षकांना देता येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.Nitesh patil dc

खर्च नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या वैध खर्चाची माहिती दिली. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार 95 लाख रुपये खर्च करू शकतो. निवडणूक प्रचार, वाहनाचा वापर, जाहिराती इत्यादी कायदेशीर खर्च करता येतो. मात्र मतदारांना कोणतेही भोजन किंवा आमिष देऊ शकत नाही,

उमेदवार त्यांच्या संयुक्त खात्यातून निवडणूक प्रचाराचा खर्च करू शकतात. दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम धनादेशाद्वारे भरणे आवश्यक आहे. सदर खर्च युपीआय आयडीद्वारेही भरता येऊ शकतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

उमेदवारांनी स्टार प्रचारकासोबत स्टेज शेअर केल्यास किंवा स्टार प्रचारकाने उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केल्यास, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर किंवा कार्यक्रमात उमेदवाराचे चित्र वापरले असल्यास, प्रचार कार्यक्रमाचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आदर्श आचारसंहितेबाबत माहिती देताना नोडल अधिकारी शिवनागौडा पाटील म्हणाले की, जात-धर्म, समुदाय, भाषा यांच्यात संघर्ष भडकावणे आणि प्रचारादरम्यान मतदारांना पैसे किंवा कोणत्याही प्रकारचे साहित्य देऊन आमिष दाखवणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे.
निवडणूक प्रचाराशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सामान्य निरीक्षक एम.के.अरविंद कुमार, पोलीस निरीक्षक पवन कुमार, खर्च निरीक्षक हरकृपाल खटाना आणि नरसिंगराव बी., पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग, डीसीपी रोहन जगदीश, प्रोबेशनरी आय.ए.एस. अधिकारी शुभम शुक्ला यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नोडल अधिकारी सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.