बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक रिंगणात एकमेव उमेदवार उतरविण्याचा निर्धार केला असून मागील लोकसभा निवडणुकीत समिती उमेदवाराला पडलेल्या मतांचाही रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलाविण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी तसेच उमेदवारांची निवड करण्यासाठी ३२ जणांची निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली . बैठकीत बोलताना शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले, हि निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समितीची शेवटची निवडणूक म्हणून समजूनच प्रत्येकाने लढावी.
समिती उमेदवाराला मागील लोकसभा निवडणुकीत पडलेल्या मतांचेही रेकॉर्ड या निवडणूक मोडून काढावे असे सांगत पुढील निवडणुकीपर्यंत सीमाप्रश्न सुटेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ठरावी यादृष्टीकोनातून प्रत्येकाने पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीसाठी कार्य करावे, असे आवाहन रणजित चव्हाण पाटील यांनी केले.
सदर बैठकीत सर्वानुमते अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. इच्छुक उमेदवारांचे अर्ज समितीने मागविले असून ६ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असेल. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेस येथे दुपारी 3 ते 6 या वेळेत 25 हजार देणगी आणि 1 लाख अनामत रक्कम सह इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन समितीने केले आहे. सदर बैठक ऍड. राजाभाऊ पाटील यांना निवड समिती अध्यक्ष तर सहकार्य म्हणून
कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, मनोहर किणेकर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी विविध समिती नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.
इच्छुक उमेदवारांचे डिपॉझिट करत दिले जाणार असून देणगी समितीला निवडणुकीला मदत म्हणून स्वीकारली जाणार आहे.