Monday, May 20, 2024

/

आयपीएल बेटिंग करणारा गजाआड; 24,700 रु. जप्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :माळमारुती पोलिसांनी अलारवाड येथे आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेटिंग करणाऱ्या एकाला रंगेहात पकडून त्याच्याकडील 24 हजार 700 रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव साजिद सरदार मुल्ला (रा. अलारवाड, ता. जि. बेळगाव) असे आहे.

अलारवाड येथील आडवी गल्ली येथे एकजण खुलेआम आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचे बॅटिंग करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस

 belgaum

ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्याने धाड टाकून साजिद याला बेटिंग करताना रंगेहात पकडले.

तसेच त्याच्याकडील 24 हजार 700 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपरोक्त कारवाईत सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शाबासकी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.