Monday, November 25, 2024

/

पालक मंत्र्यांचे भाजपला आव्हान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :देशाला आणि देशातील जनतेला मीच गॅरंटी असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने किती गॅरंटी देऊन त्या पूर्ण केल्या याची यादी द्यावी, अशी विचारणा सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस भवन येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. काँग्रेस सरकारच्या योजनांवर टीका करणारे पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकण्यासाठी प्रचार सभांमध्ये देशाला आणि देशातील जनतेला मीच गॅरंटी आहे असे सांगत आहेत.

मात्र त्यांनी प्रथम जनतेला किती गॅरंटी दिल्या आणि त्या पूर्ण केल्या याची यादी द्यावी अशी मागणी करण्याबरोबरच जनतेसाठी गॅरंटी योजना राबविण्याबरोबरच आम्ही विकास कामांसाठी देखील निधी देत आहोत. तेंव्हा गॅरंटी योजनांमुळे विकासाला खिळ बसली आहे हा भाजपचा आरोप खोटा आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

चिक्कोडी लोकसभा निवडणुकी संदर्भात बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी चिक्कोडी लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या बद्दल जनतेत नाराजी आहे. मी कायम जनतेच्या संपर्कात असतो आठवड्यातून एकदा चिक्कोडी मतक्षेत्रातला भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतो असे सांगून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळीच विजयी होतील. मात्र किती मत फरकाने विजयी होतील हे आत्ताच सांगता येणार नाही असा विश्वास विश्वास त्यांनी व्यक्त केला.Satish jarkiholi

त्याचबरोबरच कांही दिवसानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे तत्पूर्वी आमचे कार्यकर्ते आपली कामगिरी कशाप्रकारे पार पडतात त्यावर सर्व गणित अवलंबून आहे, असेही मंत्री जारकीहोळी म्हणाले.

बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने कृष्णा नदीवरील हिडकल जलाशयाच्या माध्यमातून 1 टीएमसी पाणी सोडण्याबाबत मी चर्चा केली आहे. कृष्णा नदीतील पाणी सोडण्यात आले तर मांजरी, कुडची, अथणी या ठिकाणच्या लोकांची पाण्याची सोय होऊ शकते, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढे सांगितले.

याप्रसंगी बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, काँग्रेस नेते राजेंद्र पाटील, राजदीप कौजलगी, परशुराम ढगे, अंकलगी, मंजू कांबळे, हबीब शिल्लेदार आदिंसह अन्य स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.