Saturday, September 7, 2024

/

15 वर्षानंतर वीज दर कपात; घरगुती दरात 1.10 रु. घट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकात 15 वर्षानंतर प्रथमच विजेच्या दरात कपात करण्यात आली असून नवे दर काल 1 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या 22 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आता घरगुती विजेच्या दरात 1 रुपये 10 पैशाने कपात केली जाणार असल्यामुळे मे महिन्यात देण्यात येणारे बिल त्यानुसार बनविले जाणार आहे.

यापूर्वी 1 ते 100 युनिट पर्यंत घरगुती विजेचे दर 4 रुपयांपेक्षा जास्त होते. तसेच 100 युनिट पेक्षा अधिक वीज वापरावर प्रति युनिट 7 रुपये दर होता. अलीकडे गृहज्योती योजना लागू असल्याने 200 युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा फटका बसला नाही.

मात्र गृहज्योती परिक्षेत्राबाहेर गेलेल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा धक्का बसला होता. तथापी आता 15 वर्षानंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने विजेची प्रति युनिट केलेली दर कपात पुढील प्रमाणे आहे.Hescom

एलटी घरगुती वापरासाठी : 1 रुपये 10 पैसे. एचपी वाणिज्य : 1 रुपये 25 पैसे. एचडी उद्योग : 50 पैसे. एचटी हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था : 40 पैसे. खाजगी सिंचन : 2 रुपये, खाजगी रुग्णालय,

शैक्षणिक संस्था : 50 पैसे. औद्योगिक आस्थापने : 1 रुपया. वाणिज्य आस्थापने : 50 पैसे. याशिवाय अपार्टमेंटसह वाणिज्य, उद्योग, खाजगी रुग्णालय व शिक्षण संस्थांचे मागणी शुल्क प्रति किलोवॅट 10 रुपये कमी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.