Friday, November 29, 2024

/

उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे कुमारस्वामींना आव्हान

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कुमारस्वामींना ज्या कार्यक्रमामुळे सत्ता मिळाली त्यामुळे ते भरकटले असून आगामी निवडणुकीत त्यांना योग्य धडा शिकविण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कुमारस्वामी यांना आव्हान देत कुमारस्वामी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारपद मिळेल, याबाबत साशंकता असल्याचा टोला लगावला.

कुमारस्वामींनी महिलांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात लढा द्यावा, असे आवाहन डीकेशींनी केले. काँग्रेस सरकारच्या हमी योजनेचा लाभ घेणाऱ्या भाजपच्या तीन सदस्यांना माघार घेण्याची मागणी करू नये, असे आव्हान त्यांनी कुमारस्वामी यांना दिले.

भाजपच्या जाहीरनाम्यानुसार देशात भाजप अधिकाधिक बळावर सत्ता स्थापन करू शकणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात असताना भाजपने जनतेच्या भावनांचा कधीही विचार केला नाही. गेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्यांनी काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा असल्याचे सांगितले होते. आजवर देशातील कुणाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झालेत का? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्यासह सर्व नेत्यांनी द्यावे, असे ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले.. आजवर कोणत्या शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले ? केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मंजूर करून ते मागे घेतले. आमचे सरकार आल्यानंतर राज्य सरकारने ते परत घेण्याची ऑफर दिली तेव्हा त्यांनी विरोध केला, भाजपने दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.. यापैकी कोणते आश्वासन भाजपने पूर्ण केले असा सवाल डीकेशींनी उपस्थित केला.Dk shivkumar

ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेला दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहील. कोविड काळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर बेळगाव ऐवजी दिल्ली मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले, हि शोकांतिका असल्याचे मतही डीकेशींनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार लक्ष्मण सवदी, महांतेश कौजलगी, राजू कागे, आसिफ सेठ, बाबासाहेब पाटील, महेश तम्मनवर, गणेश हुक्केरी, अशोक पटण्ण, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्रकाश हुक्केरी, बेळगाव हमी नियोजन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय नवलगट्टी , बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.