बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमांतर्गत होणारे अवैध व्यवहार रोखण्याच्या उद्देशाने आज बेळगावमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या सीमावर्ती जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱ्यांची बेळगावमध्ये बैठक आयोजिण्यात आली होती.
आयजीपी विकास कुमार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत चेकपोस्ट तपासणी, अवैध दारू तस्करी, निवडणूक काळात चालणारे अवैध धंदे याबाबत चर्चा झाली. या बैठकीला सांगली आणि जिल्ह्यांतील काही पोलीस अधिकारी झूम मिटिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी संवेदनशील भागात अधिक दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
या बैठकीला आयजीपी विकास कुमार, कोल्हापूरचे आयजीपी सुनील फुलारी, गोवा राज्याचे आयजीपी ओमवीर सिंग, बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन, एसपी भीमा शंकर गुलेद, विजापूरचे एसपी ऋषिकेश सोनवणे, कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित, डीसीपी रोहन जगदीश आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.