बेळगाव लाईव्ह : बेळगावसह ११ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बेळगाव, विजापूर, धारवाड, हावेरी, बागलकोट, बिदर, गदग, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, यादगिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव बेळगावकरांना येत असून ढगांचा गडगडाट देखील ऐकू येत आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर भागात वळिवणे जोरदार हजेरी लावली आहे. मात्र काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहिले आहे.
बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह होत असलेला पाऊस पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले असून शनिवारी कारवार जिल्ह्याच्या हल्ल्याळ, यल्लापूर, कुमठा, गोकर्ण, मुंडगोडू, मंकी, चिक्कमंगळूरच्या कोप्प, कम्मरडी,
बाळेहोन्नूर, जयपूर, कोट्टीगेहार, कडूर, एनआरपूर, उडुपीच्या कुंदापूर, कोट, सिद्धापूर, मंगळूर जिल्ह्याच्या धर्मस्थळ, सुळ्या येथे मुसळधार पाऊस झाला आहे. बेंगळूर, बेंगळूर ग्रामीण, कोलार, चिक्कबळ्ळापूर,
तुमकूर, रामनगर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, हासन, चिक्कमंगळूर, शिमोगा, विजयनगर, दावणगेरे जिल्ह्यात सोमवारी जोरदार पाऊस तर उडुपी, मंगळूर व कारवार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस साधारण पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.