बेळगाव लाईव्ह :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यात बदल झाला आहे. रविवार (दि. 28) ऐवजी शनिवारी (दि.27) बेळगावात येऊन मुक्काम करणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.
भाजप कार्यालयात बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. रविवारी सकाळी 12 वाजता होणारी जाहीर सभा सकाळी 10 वाजता होणार आहे.
शनिवारी संध्यकाळी ते बेळगावात दाखल होणार आहेत. ते एका खासगी हॉटेलमध्ये राहणार आहेत. मोदींच्या सभेला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
जगदीश शेट्टर त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 10 वाजता मालिनी सिटी येथे जाहीर सभा घेणार आहेत त्यानंतर ते पुढील कार्यक्रमाला जाणार आहेत.