बेळगाव लाईव्ह :राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याला शनिवारी रात्री घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर त्यांचे भाऊ सुंदर केळवेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांची मंगळवारी दिनांक 30 धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहिर सभा होणार आहे. या सभेची सोशल मीडियावर जागृती केल्यामुळे समिती कार्यकर्ते सचिन केळवेकर आणि त्यांच्या भावावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.
राजकीय वैमनस्यातून अज्ञातांनी हा हल्ला केला असून दोन्ही समिती कार्यकर्त्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री कऱण्यात आलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
बेळगाव सह सीमा भागामध्ये मराठा समाजाची मराठी भाषकांची संख्या अग्रगण्य आहे त्यातच जरांगे पाटील सभा होणार असल्याने राष्ट्रीय पक्षाना पोटशूळ उठला आहे एकंदर मराठा समाज एकवटला तर ती शक्ती नक्कीच आपल्याला भारी पडेल या विचाराने हादरलेल्या राष्ट्रीय पक्षांनी आपल्या हस्तका करवी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला केला आहे. आजवरचा इतिहास पाहता मराठी माणसावर ज्या ज्या वेळी संकटे येतात त्या त्या वेळी समितीनिष्ट जनता एकत्र येते मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी असाच अशलांघ्य प्रकार माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला होता.
त्यावेळी मराठी जनतेने एकवटून जी संघटित शक्ती दाखवली त्यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी तो वाद मिटविला होता परंतु मराठा समाज ज्यांच्या मनात खुपतो त्या राजकीय पक्षाच्या लोकांनी परत एकदा समितीच्या कार्यकर्त्यावर हल्ला करून परत कुरापत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावात असताना मानवी हक्कांचे उल्लंघन करून सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्या बाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.