बेळगाव लाईव्ह :पाण्यावरून उद्भवलेल्या बाचाबाचीचे पर्यवसान आयपीएसअधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसह आपल्याच गावातील एक महिला आणि तिच्या पतीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून ऐगळी पोलीस ठाण्यामध्ये गडादी यांच्यासह एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ऐगळी गावातील नकुशा सैदप्पा गडादी या महिलेने स्वतःसह आपल्या पतिवर हल्ला झाल्याची तक्रार ऐगळी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी रवींद्र गडादी यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध भादवी 307 कलमासह इतर कलमांतर्गत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, ऐगळी गावातील सार्वजनिक विहिरी वरती जाळी लावण्यात आली होती. फिर्याददाराने ती जाळी काढून पाणी वापरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती.
ग्रामपंचायतीने परवानगी दिल्यानंतर फिर्यादाराने विहिरीच्या पाण्याचा वापर सुरू केला होता. त्याला गडादी यांच्यासह अन्य लोकांनी आक्षेप घेतला. यावरून झालेल्या झालेल्या जोरदार वादावादीचे पर्यवसान नकुशा गडादी व तिचा पती सैदप्पा यांच्यावर हल्ला होण्यामध्ये झाले.
रवींद्र गडादि यांनी व अन्य कांही जणांनी आपल्यावर हल्ला केला असून त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी फिर्यादराने केली आहे. ऐगळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.