Monday, December 23, 2024

/

झाडशहापूरात जाळल्या पाच गंजी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आधीच चाऱ्याचा तुटवडा त्यात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असताना त्याचा सामना करत जगतोय.त्यात शेतातील गवत गंज्यानी आग लावण्याच कारस्थान कांही समाजकंटक करताना सर्रास दिसत आहेत.झाडशहापूरात पाच गंज्या जळाल्या आहेत.

याबाबत समजलेले अधिक माहितीनुसार मागील काही दिवसापूर्वी येळ्ळूर शिवारातील अनेक वाळल्या चाऱ्याच्या तसे भाताच्या गंजा जळाल्या. आता परत झाडशहापूरमधील शिवारात एकदम पाच गंजाना आग लावल्याने त्या जळून खाक झाल्याने शेतकरी अती संकटात सापडले आहेत.

या जळलेल्या  गंजी मधून भरमा गोरल यांच्या दोन गंजा,नारायण गोरल यांची एक गंजी तसेच येळ्ळूर शेतकऱ्यांच्या त्या शिवारातील दोन गंजा जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी तलाठ्यामार्फत पंचनामा करुन तहसिलदारानी सरकार दरबारी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.