बेळगाव लाईव्ह: एक महाराष्ट्राचे आराध्या दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज तर दुसरा महाराष्ट्राचा पारंपरिक मर्दानी खेळ कुस्ती! दोन्हीत महाराष्ट्र आलाच! बुधवारी सायंकाळी बेळगावात आनंदवाडी येथे झालेल्या कुस्ती आखाड्यात नेपाळच्या देवा थापाने कुस्ती सुरू होताना शिवाजी महाराज की जय आणि जय महाराष्ट्र अश्या दोन्ही घोषणा उत्साहात दिल्या.
खरं तर नेपाळच्या पैलवानाकडून कुस्ती आणि महाराष्ट्र, व शिवरायांचा जयजयकार करण्यासाठी जय महाराष्ट्र अशी घोषणा ओघात दिली.पैलवान थापा यांच्या तोंडातून आपसूक ओघात आलेल्या घोषणातील महाराष्ट्र भावना दर्शवणारी घोषणा त्या उद्योजकांला खुपली त्यांनी त्या घोषणेवर खुलासा केला. या वेळी खुलासा करायची कोणतीही क्षणिक गरज नव्हती मात्र उद्योजकाने चक्क माईक हिसकावून घेत’ महाराष्ट्र’ भावनेचाचं अपमान करून टाकला.
त्यावेळी मैदानात उपस्थित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते दत्ता जाधव, आर एम चौगुले सागर पाटील, गजानन पवार यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेल्या त्या उद्योजकाची चांगलीच हजेरी घेतली. सार्वजनिक रित्या महाराष्ट्राचा झालेला अपमान सहन झाला नसल्याने संतप्त होऊन जाब विचारला.
खरं तर कुस्तीच्या मैदानात कुणीही असे वादग्रस्त वक्तव्य करू नये राजकारण तर आणुच नये कुणाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये मात्र आततायी पणा करणाऱ्या त्या उद्योजकाला जोरदार विरोधाचा सामना करावा लागला.
एक कुस्ती शौकीन म्हणून खेळ पाहायला गेलेल्या कुस्ती प्रेमी मधून दोन भाषिकात तेढ निर्माण करण्याचे काम का यांच्याकडून झाले याबत देखील चर्चा रंगली होती. त्या उद्योजकाला व्यवसाय उद्योग करायला कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी महाराष्ट्र चालतो मग महाराष्ट्र भावना का चालत नाही असाही संतप्त सवाल व्यक्त करण्यात आला आहे.
मैदानात होत कुस्तीचे होत असलेले मराठीतून समालोचन, मराठी वातावरण पाहता त्या नेपाळी पैलवानाने महाराष्ट्र आणि शिवरायांचा जयजयकार केला मात्र बेळगावात महाराष्ट्राचा जयजयकार करू नये बेळगाव हे कर्नाटकात आहे असे म्हणत उपस्थित मराठी जनसमुदायाच्या अपमान केला. वास्तविक पाहता थापा यांच्या घोषणेकडे दुर्लक्ष केलं तरी चालले असते मात्र उद्योजकाला आततायीपणा नडला आणि त्यांनी नुसता वाद ओढवून घेतला त्याची चर्चा याठिकाणी जोरदार रंगली होती.