पक्षांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे विजय मोरे यांचे आवाहन

0
1
vijay more social work
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्याच्या वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. त्यासाठी शहर व तालुक्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी पक्षांसाठी छोटया भांड्यांमध्ये पाण्याची सोय करावी, असे आवाहन माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी केले आहे.

शहरातील लोकांनी आपल्या घरांच्या छतावर अथवा इमारतींच्या टेरेसवर कुठे जागा असेल त्या ठिकाणी पक्षांसाठी छोट्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे.

त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आपापल्या शेतामध्ये प्राणी आणि पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

 belgaum

फक्त दोन महिने ही व्यवस्था केल्यामुळे कित्येक प्राण्यांचा पक्षांचा जीव वाचला जाईल. तेंव्हा बेळगाववासियांनी आपण सर्वांनी हा उपक्रम राबवण्याद्वारे संघटितपणे प्राणी -पक्षांचा जीव वाचवूया, असे माजी महापौर विजय मोरे यांनी आपल्या आवाहनात म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.