बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली असून यंदाच्या या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 40 लाख 62 हजार 210 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 20 लाख 35 हजार 731, महिला मतदार 20 लाख 26 हजार 304, तृतीयपंथी 175 आणि दिव्यांग मतदार 56 हजार 68 इतके आहेत.
जिल्ह्यातील बेळगाव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतक्षेत्राची एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. अरभावी -2,55,971. गोकाक –2,58,273. बेळगाव उत्तर -2,61,673. बेळगाव दक्षिण -2,54,966. बेळगाव ग्रामीण -2,64,771. बैलहोंगल -1,97,129. सौंदत्ती -यल्लमा -2,03,165. रामदुर्ग -2,08,151. एकूण : 19,04,999. चिक्कोडी लोकसभा
मतदारसंघातील मतदार : निपाणी -2,32,505. चिक्कोडी -सदलगा -2,30,297. अथणी -2,36,419. कागवाड -2,03,305 कुडची –2,01,398. रायबाग -2,18,293. हुक्केरी -2,12,647. यमकनमर्डी -2,06,894 एकूण : 17,41,758. कारवारच्या बेळगावमध्ये असलेल्या मतदारसंघातील मतदार : खानापूर -2,17,524. कित्तूर -1,98,829. एकूण : 4,16,353. जिल्ह्यात एकूण मतदार 40,62,210 इतके असून त्यामध्ये 20,35,731 पुरुष, 20,26,304 महिला, 175 तृतीयपंथीय आणि 56,068 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 80 वर्षावरील जेष्ठ नागरिक मतदार 45,000 आहेत. याव्यतिरिक्त बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील नवमतदारांची संख्या अनुक्रमे 47,095 व 50,589 इतकी आहे. कारवार (खानापूर व कित्तूर) येथे ही संख्या 10,912 इतकी आहे. जिल्ह्यामध्ये आचारसंहिता अंमलबजावणी करता 631 पथकांची स्थापना करण्याबरोबरच जिल्ह्यात ठिकठिकाणी एकूण 64 तपासणी नाके चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.
आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार केंद्रेही स्थापण्यात आली असून त्यांचे स्थळ व दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे : 1) चिक्कोडी लोकसभा निवडणूक अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय चिकोडी 08338 -272132, 2) बेळगाव लोकसभा निवडणुका अधिकारी, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव 0831 -2406319,
3) तक्रार निवारण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव, 0831 -2407325, 4) आचारसंहिता नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव, 0831 -2406332, 5) सी -व्हीजील, जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव, 0831 -2406304.