बेळगाव लाईव्ह:पोहण्यासाठी उतरले असताना शेततळ्यात बुडून शिक्षक वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात घडली आहे.
कल्लाप्पा गाणीगेर ( वय 36) व मुले मनोज कल्लापा गाणीगेर (वय 11) , मदन कल्लापा गाणीगेर ( वय 9) असे दुर्दैवी वडील व मुलांची नावे आहेत.
याबद्दल अधिक मूळचे सौन्दती तालुक्यातील सतिगेरी गावचे असलेले कलाप्पा गानिगेर निडगुंदी गावातील हुक्केरी मळ्यातील मगदूम सरकारी शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. तसेच त्यांची पत्नी देखील सरकारी शाळेत शिक्षिका मम्हणून कार्यरत आहेत.
हे कुटुंब निडगुंदी गावात राहत असून आज सुट्टी असल्याने पोहणे शिकविण्यासाठी दोन्ही मुलांना घेऊन शेततळ्यावर घेऊन गेले.
शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर दोन्ही मुले वडील कलाप्पा यांना मिठी मारले. पोहता न आल्याने वडील कलाप्पा यांच्यासह दोन मुले असे तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे.
या घटनेमुळे कुटुंबाने हंबरडा फोडला असून गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.