बेळगाव लाईव्ह: खानापूर प्रादेशिक विभागाच्या उपवनसंरक्षक अधिकारी म्हणून सुनीता निंबरगी यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वी सुनीता निंबरगी रायबागच्या सहाय्यक वनसंरक्षक या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याची (सेवेची)दखल घेऊन २०२० मध्ये मुख्यमंत्री पदकाने गौरविण्यात आले होते.
आता त्यांची सुनीता निंबरगी यांची खानापूरच्या एसीएफपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
यावेळी खानापूरचे आरएफओ नागराज बाळेहोसूर, नंदगड विभागीय उप वनाधिकारी महांतेश लच्यन, विनायक पाटील, उप वनाधिकारी मुरगोड तसेच वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
सुनिता निंबरगी बेळगावचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या मोठ्या बहिण होत.