Sunday, December 22, 2024

शेट्टरना भाजप बळीचा बकरा बनविण्याच्या तयारीत : आम. सवदी यांची टीका

 belgaum

बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपने बेळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त राजकीय सूत्रांनी व्यक्त केले असून या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी भाजपवर टीका केली आहे.

जगदीश शेट्टर यांना जाणीवपूर्वक बेळगावात आणून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरू असून, बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांना ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न असल्याचे विधान आमदार लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.

आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आम. सवदी म्हणाले, बेळगाव लोकसभा मतदार संघातून कोणती बकरी उभी करायची आणि त्या बकरीचा बळी कसा द्यायचा याचे शिस्तबद्ध नियोजन केले आहे.

शेट्टर यांनी आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नये, आणि मिळाली तरी जिंकून संसदेत प्रवेश करू नये, तर पराभूत होऊन घरी बसावे अशीच योजना भाजप नेत्यांनी शेट्टर यांच्यासाठी आखली आहे, अशी घणाघाती टीका सवदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Popular Articles