बेळगाव लाईव्ह:बेळगाव लाईव्ह : चालत्या मालगाडीच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव मध्ये देसूराजवळ रविवारी घडली.
मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर व्यक्ती 30-35 वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यरात्री बेळगावहून हुबळीकडे निघालेल्या एक्स्प्रेस गाडीत डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्तीच्या गळ्यात लाल धागा असून 5.७ इंच , गव्हाळ रंग असे वर्णन रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.