Wednesday, January 8, 2025

/

धोबीघाट येथे ‘प्यास’ करणार तलावाची निर्मिती

 belgaum

बेळगाव लाईव्ह:स्नेहम इंडस्ट्रीजच्या सीएसआर अनुदानातून शहरातील प्यास फाउंडेशनतर्फे कॅम्प येथील धोबीघाट शेजारी मानवनिर्मित तलाव तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

अर्धशतकानंतर प्रथमच बेळगाव शहरात नवीन तलाव बांधण्याचा प्रयत्न होणार असून स्नेहम इंडस्ट्रीजच्या सीएसआर अनुदानातून प्यास फाऊंडेशनने बेळगावीतील धोबीघाट शेजारी या नव्या तलाव निर्मितीचे काम सुरू केले आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांचाही पूजेमध्ये सहभाग होता.

सदर तलाव प्रकल्पाचे क्षेत्रफळ 3 एकर असणार असून तलावाची खोली अंदाजे 15 फूट असेल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट कॅन्टोन्मेंट भागातील पावसाचे संपूर्ण पाणी साठवणे हा आहे. जेणेकरून भूजल पातळीत वाढ होणार आहे. पाण्याचा स्रोत म्हणून जवळून वाहणारा नाल्यालाही तलावाला जोडला जाईल. हा तलाव प्रकल्प यशस्वी झाल्यास कॅम्प परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.Pyas

भूमिपूजनाप्रसंगी बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी या पद्धतीचा प्रकल्प राबविण्यास प्यास फाउंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. सीईओ राजीव कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांना या प्रकल्पाची माहिती देण्याबरोबरच प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्यासचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी प्रकल्पाबद्दल माहिती देताना गेल्या अर्ध शतकात बेळगाव येथे बांधण्यात येणारा हा पहिला मानवनिर्मित तलाव असल्याचे नमूद केले.

जो कॅम्पमधील भूजल पातळी वाढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वरदान ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्नेहमच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी प्यासचे सीएसआर भागीदार अनिश मेत्राणी, सुनीश मेत्राणी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य अभियंता सतीश मन्नूरकर यांच्यासह प्यासच्या सचिव डॉ. प्रीती कोरे, अवधूत सामंत, सतीश लाड, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, रोहन आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.