बेळगाव लाईव्ह: रस्ते अपघातात एएसआय घटनास्थळी ठार झाल्याची घटना यरगट्टी येथे काल रात्री घडली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोडवाड पोलीस स्थानकाचे पी एस आय नंदिश्वर यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे.
याचं कारण असे आहे की बैलहोंगल येथील दोडवाड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयकांत मिकली यांचे यरगट्टी येथे रस्ते अपघातात निधन झाले होते या अपघातावेळी मिकली यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते त्याला जबाबदार धरत दोडवाड पोलीस स्थानकाच्या पीएसआयलाच निलंबित करण्यात.
जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस संघांना दुचाकी वर फिरताना पोलीस कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करावे याबाबत नोटीस बजावली होती मात्र दोडवाड पोलिसांचे एएसआय मिकली यांनी अपघात झाला त्यावेळी हेल्मेट परिधान केले नव्हते त्याला जबाबदार धरत पोलीस अधीक्षकांनी पीएसआयला निलंबित केले आहे.
वास्तविक पाहता पोलीस उपनिरीक्षकांनी स्थानकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवतेवेळी सर्वांनी हेल्मेट परिधान करावे याबाबत सूचना करणे गरजेचे होते तसे न करता मिकली यांचे रस्ते अपघातात निधन झाले होते या घटनेची कोणतीही माहिती पीएसआय नंदीश्वर यांनी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले नाहीत याला जबाबदार धरून पोलीस उपनिरीक्षकालाच निलंबित करण्यात आले आहे.