बेळगाव लाईव्ह:बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी आज गुरुवारी सकाळी शहरातील विविध पोलीस स्थानकांना भेट देऊन पाहणी करण्याद्वारे आवश्यक सूचना केल्या.
बेळगाव शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून गेल्या सोमवारी पदभार स्वीकारलेल्या इडा मार्टिन यांनी शहरातील मार्केट पोलीस स्थानक, खडेबाजार पोलीस स्थानक, कॅम्प पोलीस स्थानक, रहदारी दक्षिण पोलीस स्थानक वगैरे विविध पोलीस स्थानकांना भेट देऊन तेथील स्वच्छता, शिस्त आणि विविध गुन्ह्यांखाली जप्त केलेल्या वाहनांची पाहणी केली.
पोलीस स्थानकातील कामकाजाची माहिती जाणून घेण्याबरोबरच आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
याखेरीज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मार्टिन यांनी पोलीस आयुक्तालय व्याप्ती येणाऱ्या तपासणी नाक्यांना (चेकपोस्ट) देखील भेट देऊन पाहणी केली.
तसेच तेथे नियुक्त पोलीस अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून तक्रारीला जागा न ठेवता चोख कर्तव्य बजावण्याची सूचना केली.