बेळगाव लाईव्ह ;बेळगाव शहरातील कॅम्प येथील हृदयाच्या दुर्धर आजाराशी लढणारे रहिवासी 43 वर्षीय प्रवीण आर. जाधव यांच्यावर तातडीने हृदयावरील सीएबीजी या महागड्या शस्त्रक्रियेची (ओपन-हार्ट सर्जरी) आवश्यक असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
कॅम्प येथील रहिवासी प्रवीण आर. जाधव यांना कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी-टीव्हीडी) हा हृदयाशी संबंधित आजार झाला आहे. यासाठी त्यांच्यावर तातडीने ओपन-हार्ट सर्जरी (सीएबीजी) ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.
सदर शस्त्रक्रियेचा खर्च 2,50,000 रुपये इतका आहे. जाधव कुटुंबीयांसाठी हा खर्च आवाक्या बाहेरील आहे. यासाठी त्याला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. प्रत्येकाचे सहाय्य कितीही लहान असले तरी प्रवीण जाधव यांच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणू शकते.
त्यांना सध्याच्या दुर्बल स्थितीच्या ओझ्याशिवाय जगण्याची संधी देऊ शकते. तेंव्हा दानशूर व्यक्ती, सेवाभावी संघ -संस्था आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्या परीने होईल तितके सहाय्य करावे आणि प्रवीण जाधव यांना जीवदान देऊन त्यांना निरोगी आणि आनंदी भविष्याची भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक मदतीसाठी इच्छुकांनी पुढील ठिकाणी आपली मदत पोहोचवावी. मोबाईल क्र. +919845375878 खातेदार :प्रवीण जाधव खाते क्रमांक :50100500532207 आयएफएससी : एचडीएफसी 0003182 शाखा :नेसर्गी खाते प्रकार :बचत व्हर्च्युअल पेमेंट, पत्ता:8073694474@ एचडीएफसीबँक