बेळगाव लाईव्ह:बेळगाव येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखल्याने बेळगाव सह सीमाभागात वाद निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या या कुस्ती आखाड्यात आयोजकांनी महाराष्ट्राची घोषणा देण्यापासून रोखून आततायीपणा केला होता त्यानंतर मैदानात आयोजकाना जाब विचारण्यात आला होता.
त्यावेळी समितीचे शुभम शेळके समाज माध्यमावर प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला होता त्यानंतर पोटशूळ उठलेल्या काही संघटनांनी शेळके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार माळ मारुती पोलिसांनी दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
या कारवाई मुळे कानडी फलकाच्या सक्ती सोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप करत मराठी जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.