बेळगाव लाईव्ह : डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. मात्र रायबागमधील मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कृत्यावरून सर्वांना धक्का बसेल, अशी माहिती समोर आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुका हा आधीपासूनच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
या भागातील शेतकरी येथील दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच मेटाकुटीला आले असताना रायबाग तालुक्यातील मुख्य वैद्याधिकाऱ्याने केलेला कारभार पाहून शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रायबाग तालुक्याचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सौदलगी यांनी २८ फेब्रुवारी रोजी कामावरून सुट्टी घेतली होती. कामावरून सुट्टी घेतलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चक्क बारमध्ये जाऊन दारू विक्री केल्याचा व्हिडीओ समोर आला असल्याने या भागात एकाच चर्चा सुरु आहे.
या घटनेची रायबागसह आसपास परिसरात जोरदार चर्चा सुरु असून शेतकरी वर्गातून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या रायबाग मधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सदर व्हिडीओ सध्या वायरल होत असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.