बेळगाव लाईव्ह :राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांतील इयत्ता 5, 8, 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय ग्राह्य धरण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने देखील ग्राह्य मानला आहे.
राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांतील इयत्ता 5, 8, 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या अपिलावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आपला आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती के सोमशेखर आणि न्यायमूर्ती राजेश राय के. यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. इयत्ता 5,8, 9 आणि 11 च्या बोर्ड परीक्षा ग्राह्य धरण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने ग्राह्य करण्याबरोबरच राज्य अपीलांना परवानगी दिली आहे.
एकल न्यायाधीशाचा निर्णय बाजूला ठेवला, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 12 मार्चच्या स्थगिती आदेशानंतर रखडलेल्या इयत्ता 5, 8, 9, 11 वीच्या परीक्षा पुन्हा सुरू करण्यास न्यायालयाने कर्नाटक राज्य सरकारला परवानगी दिली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेल्या अपीलला परवानगी दिली असून बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करणारा एकल न्यायाधीश खंडपीठाचा आदेश बाजूला सारला आहे.
राज्य सरकारला इयत्ता 5, 8, 9 च्या विद्यार्थ्यांचे उर्वरित मूल्यांकन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रखडलेली 11वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाला परीक्षांचे नवे वेळापत्रक जारी करावे लागणार आहे.