Sunday, May 5, 2024

/

जे. पी. नड्डा यांची विरोधकांवर जोरदार टीका

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कालपासून बेळगाव दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज बेळगावमधील भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजिण्यात आली होती. चिकोडी आणि बेळगाव अशा दोन्ही ठिकाणी आज भाजप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जे. पी. नड्डा यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकारला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना जे. पी. नड्डा म्हणले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आजतागायत देशासाठी सर्वोत्तम काम केले असून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना प्रशिक्षित करून स्वावलंबी बनविले आहे. २०२० साली जगभरात कोरोनाने थैमान घातले. या कालावधीत मोदी सरकारने जगभरात विक्रम प्रस्थापित करून कोरोना परिस्थितीवर मात केली. अयोध्येत श्री राम मंदिर बांधणे, जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करणे यासह भाजपने दिलेल्या विविध आश्वासनांची पूर्तता मोदी सरकारने केली असून दूरदर्शी भाजपला जनता साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिक्कोडी येथे आयोजित संमेलनात कर्नाटक राज्य दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा थेट आरोप जे. पी. नड्डा यांनी केला. कर्नाटकातील शक्ती केंद्रावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना काँग्रेस सरकार आश्रय देत असल्याची टीकाही केली. विधानसभेत पाकिस्तानचा जयजयकार करण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मौनाचा हेतू काय, हे त्यांनी स्पष्ट करावे, अल्पसंख्याकांना खूष करण्यासाठी काँग्रेस नेते मौन बाळगून आहेत, अशी टीका त्यांनी केली.Jp nadda

 belgaum

ज्या काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील सदस्य पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत, त्या काँग्रेस पक्षाला राज्यातील जनता साथ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, आमचे सरकार असताना परिस्थिती शांत होती. गरीब, महिला (नारीशक्ती), शेतकरी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणारा पक्ष म्हणून भाजपचा विकास झाला आहे. भाजप हा विचारधारेवर आधारलेला पक्ष आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, आमदार रमेश कत्ती, माजी मंत्री शशिकला जोल्ले, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ, लोकसभा निवडणूक प्रदेश प्रभारी तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, विभागीय सहप्रभारी बसवराज यंकांची, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. बसवराज हुंद्री, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार दुर्योधन ऐहोळे, निखिल कत्ती, माजी आमदार श्रीमंत पाटील, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, विभाग प्रभारी चंद्रशेखर कवठगी, आमदार अभय पाटील, हनुमंत निराणी आदींसह विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.