बेळगाव लाईव्ह| शिनोळी येथील त्या उद्योजकाच्या फलकाला महाराष्ट्र एकीकरण समिती आणि चंदगड शिवसेनेच्या युवकांनी फासले काळे आहे. बेळगावातील हा वाद आता चक्क कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर महाराष्ट्रात जाऊन पोहोचला आहे.
उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या मालमत्ता शिनोळीत महाराष्ट्रात आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील समितीच्या कार्यकर्त्यांना जाऊन निदर्शने केली.
गेल्या तीन दिवसांपूर्वी बेळगाव आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी नेपाळच्या पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखले होते याशिवाय जय महाराष्ट्र म्हटल्याने उंची कमी होईल असे अपमानजनक वक्तव्यं केले होते त्याचा सर्वत्र निषेध झाला होता.
उद्योजक श्रीकांत देसाई यांचे फलक महाराष्ट्र शिनोळीत झळकत होते.रविवारी सकाळी त्या फलकास महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासत जय महाराष्ट्र लिहिले. जय महाराष्ट्र म्हणावयास नको महाराष्ट्रात फलक उद्योग का हवेत? असा प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
दरम्यान त्याच दिवशी कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दत्ता जाधव आर एम चौगुले सागर पाटील आणि गजानन पवार यांनी विरोध करत त्या उद्योजकाला जाब विचारला होता मात्र अद्याप त्या उद्योजका कडून कोणतीही दिलगिरी किंवा वक्तव्य आले नाही त्यामुळे संतप्त कार्यकर्ते ठिकठिकाणी विरोध निदर्शने करतच आहेत.