बेळगाव लाईव्ह :बेळगाव लोकसभा मतदारसंघ 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाला असून हा जिल्हा 7 मे 2024 रोजी मतदान करणार आहे. त्या अनुषंगाने थोडक्यात जाणून घेऊया बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास…
बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस (आयएनसी) आतापर्यंत 1957, 1962, 1967, 1971, 1977, 1980, 1984, 1989, 1991 आणि 1999 मध्ये अशी 10 वेळा जिंकली. जनता दलाने 1996 मध्ये एकदाच विजय मिळवला आहे. भाजपने 1998, 2004, 2009, 2014, 2019, 2021 (पोटनिवडणूक) मध्ये असा 6 वेळा विजय मिळवला आहे. एकंदर या मतदारसंघात काँग्रेस 10, भाजप 6 आणि निजद 1 विजयी झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याद्वारे बेळगाव देशात गाजले ते म्हणजे 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 463 उमेदवार होते.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्या लोकसभेपासून सध्याच्या 17व्या लोकसभेपर्यंत निवडून आलेल्या संसद सदस्यांची अर्थात खासदारांची ही संपूर्ण यादी आहे. या यादीत सिदनाळ हे 07, 08, 09, 10 व्या लोकसभेसाठी सलग 4 वेळा खासदार राहून आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या खासदारांची यादी (अनुक्रमे खासदार, पक्ष, मतदारसंघ, लोकसभा. यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
बळवंत नागेश दातार, काँग्रेस, बेळगाव (म्हैसूर), 01. शंकरगौडा वीरंगौडा पाटील, _, बेळगाव दक्षिण (बॉम्बे), 01. बळवंत नागेश दातार, काँग्रेस, बेळगाव (म्हैसूर), 02,03. एच. व्ही. कौजलगी, काँग्रेस, बेळगाव (म्हैसूर), 03. एम. एन. नागनूर, काँग्रेस, बेळगाव (म्हैसूर), 04. ए. के. कोटरशेट्टी, काँग्रेस, बेळगाव 05,06. षण्मुखप्पा सिदनाळ, काँग्रेस, बेळगाव, 07,08,09,10. शिवानंद हेमाप्पा कौजलगी, जनता दल, बेळगाव, 11. बाबागौडा पाटील, भाजपा, बेळगाव, 12. अमरसिंह वसंतराव पाटील, काँग्रेस, बेळगाव, 13. सुरेश चनाबसप्पा अंगडी, भाजपा, बेळगाव, 14,15,16. श्रीमती मंगल सुरेश अंगडी, भाजपा, बेळगाव, 17.
2021 च्या पोटनिवडणुका सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झाल्या, जे त्यावेळी रेल्वेचे राज्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी यांच्या विरोधात 5240 मतांनी विजय मिळवला. मंगल अंगडी यांना गोकाक विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली, तर बेळगाव उत्तरने त्यांना सर्वात कमी मतदान केले.
खासदार मंगला अंगडी यांना झालेले मतदान अनुक्रमे विधानसभा मतदारसंघ नांव आणि पडलेली मते यानुसार (यामध्ये पोस्टल मतांचा समावेश नाही) पुढील प्रमाणे आहे. गोकाक -87307, रामदुर्ग -56909, अरभावी -55957, बेळगाव दक्षिण -53226, बैलहोंगल -49616, बेळगाव ग्रामीण -47688, सौंदत्ती-47497, बेळगाव उत्तर -38668. एकूण -436868.
ईसीआय वेबसाइटनुसार सुरक्षित केलेली अंतिम मते (अनुक्रमे ओ.एस.एन., उमेदवार, पक्ष, ईव्हीएम मते, पोस्टल मते, एकूण मते, मतांचा टक्का यानुसार) पुढील प्रमाणे आहेत. 1) मंगल अंगडी सुरेश -भारतीय जनता पार्टी, 436868, 3459, 440327, 43.07 टक्के. 2) सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 432882, 2205, 435087, 42.56. 3) विवेकानंद बाबू घंटी -कर्नाटक राष्ट्र समिती, 4770, 74, 4844, 0.47. 4) श्री वेंकटेश्वर महास्वामीजी -हिंदुस्थान जनता पार्टी, 1955, 60, 2015, 0.2. 5) मारलिंगन्नवर सुरेश बसप्पा -कर्नाटक कर्मचारी पक्ष, 1950, 71, 2021, 0.2. 6) आप्पासाहेब श्रीपती कुरणे -अपक्ष, 1308, 56, 1364, 0.13. 7) गौतम यमनाप्पा कांबळे -अपक्ष, 1366, 24, 1390, 0.14. 8) नागप्पा कळसन्नावर -अपक्ष, 2982, 24, 3006, 0.29. 9) शुभम विक्रांत शेळके -अपक्ष, 116923, 251, 117174, 11.46. 10) श्रीकांत पडसलगी -अपक्ष, 4347, 41, 4388, 0.43. 11) नोटा -वरीलपैकी काहींही नाही, 10563, 68, 10631, 1.04 टक्के. एकंदर ईव्हीएम मते 1015914, पोस्टल मते 6333 आणि दोन्ही मिळून एकूण मते 1022247.
असा आहे बेळगाव लोकसभा मतदार संघाचा इतिहास तक्ता
Member of Parliament | Party | Constituency | Loksabha |
Shri Balwant Nagesh Datar | Congress | Belgaum (Mysore) | 01 |
Shri Shankargauda Veerangauda Patil | Belgaum South (Bombay) | 01 | |
Shri Balwant Nagesh Datar | Congress | Belgaum (Mysore) | 02,03 |
Shri H.V. Koujalgi | Congress | Belgaum (Mysore) | 03 |
Shri M.N. Naghnoor | Congress | Belgaum (Mysore) | 04 |
Shri A.K. Kotrashetti | Congress | Belgaum | 05,06 |
Shri Shanmukhappa Sidnal | Congress | Belgaum | 07,08,09,10 |
Shri Shivanand Hemappa Koujalgi | Janta Dal | Belgaum | 11 |
Shri Babagouda Patil | BJP | Belgaum | 12 |
Shri Amarsinh Vasantrao Patil | Congress | Belgaum | 13 |
Shri.Suresh Chanabasappa Angadi | BJP | Belgaum | 14,15,16 |
Smt.Mangal Suresh Angadi | BJP | Belgaum | 17 |