Wednesday, November 20, 2024

/

बिबट्याची बेळगाव शहराला पुन्हा धावती भेट?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या हद्दीतील हिंडाल्को फॅक्टरीजवळ सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाघ -बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र परिसरात आढळून आलेल्या पंजांच्या ठशावरून तो प्राणी बिबट्याच असल्याचे समजते.

दुसरीकडे वनखात्याने वाघाचा केवळ तर्क असून आणि वाघ आला असता तरी तो पहाटेच पुन्हा जंगलात निघून गेला असावा असे मत व्यक्त केले आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार वन्यजीव अभ्यासकांनी हा प्राणी बिबट्या असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र निश्चितपणे यावर कोणतेही मत व्यक्त करण्यात आले नाही.

बेळगाव शहरात अलीकडच्या काळात वन्य प्राण्यांचे वारंवार आगमन होत असून गेल्या आठवड्यात जंगली हत्तीचे दर्शन झाले होते. आता वाघ -बिबट्या सदृश्य पाणी प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे हिंडाल्को फॅक्टरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत वनखात्याने स्पष्टीकरण दिले आहे. बेळगाव शहराच्या हद्दीत हिंडाल्को कारखाना परिसरात ‘वाघ’ दाखल झाल्याचे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. आतापर्यंत तो केवळ तर्क आहे. आमचे वन कर्मचारी वाघा बाबत पुष्टी करण्यासाठी परिसरात तपास करत असून कृपया सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंडाल्कोला लागूनच मोठे वनक्षेत्र आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात आलेला सदर प्राणी पुन्हा जंगलात जाण्याची पूर्ण शक्यता आहे. यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा वनसंरक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे.Leapard

दरम्यान, बेळगावचे परिक्षेत्र वनाधिकारी (आरएफओ) हिंडाल्को फॅक्टरीजवळ शहर हद्दीत वाघ दिसल्याच्या घटनेला नकार देत असले तरी आढळून आलेला तो प्राणी वाघ नव्हे तर पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या होता, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. संबंधित ठिकाणी त्या बिबट्याचे ठसे देखील आढळून आले आहेत. सध्या उन्हाळ्याचा मोसम सुरू असल्यामुळे पाण्याच्या शोधार्थ तो बिबट्या शहराकडे फिरकला असावा असा कयास आहे.

अलीकडेच शहर हद्दीमध्ये जंगली हत्तीचे आगमन झाले होते. त्यानुसार बिबट्याचे आगमन झाल्यास त्यात नवल नाही, असे सूत्रांनी सांगितले. पश्चिम घाटासह भीमगड अभयारण्यात वाघ आहेत. त्याचप्रमाणे वाघ हा प्राणी सहसा मानवी वसाहतीकडे फिरकत नाही. त्यामुळे हिंडाल्को फॅक्टरीजवळ दिसलेला प्राणी हा निश्चितपणे वाघ नसून बिबट्याच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.