बेळगाव लाईव्ह: सौंदत्ती यल्लमाला देवदर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील एका वृद्ध कुटुंबाला बस स्थानकावर पर्स हरवल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यापासून पर्स शोधण्यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी मदत केली आहे.
याबाबतची माहिती अशी की सुनिता धात्रक या पुण्याहून सौंदत्तीला यल्लम्माला देव दर्शनाला जात होते त्यावेळी सुनीता सौंदत्ती बस मधून बेळगावकडे प्रवास करताना मध्यवर्ती बसस्थानकातून बसमधून खाली उतरताना बसमध्ये पर्स विसरले होते. त्या नंतर बसमधून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर त्यांनी बसमध्ये तपासणी केली पर्स लंपास केली गेली . त्या पर्स मध्ये मोबाईल, 3 एटीएम कार्ड, 1000 रूपये रोख रक्कम होती.
यावेळी सुनीता धात्रक मध्यवर्ती बसस्थानकावर रडत होत्या तेव्हा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले मध्यवर्ती बसस्थानकात होते त्यावेळी त्यांनी तिची पर्स शोधण्यासाठी मदत केली.
सुरुवातीला मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर तक्रार कंट्रोलर सांगितले कंट्रोलरनी सदर तक्रार गांभीर्याने घेतली नाही.या परिसरात सीसीटीव्ही नाहीत कस शोध घेता येईल? मार्केट पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पण मध्यवर्ती बसस्थानक मध्ये सीसीटीव्ही नाहीत.
स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी निधी खर्च करण्यात आला पण सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत याचा सुनिता धात्रक यांच्या सारख्या प्रवाश्यांना बसला आहे. निराश होऊन सुनीता पुण्याकडे रवाने झाल्या अश्या समस्या कडे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी भावना व्यक्त होत आहे.