बेळगाव लाईव्ह:बेळगाव येथील फळांच्या होलसेल बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात हापुस, पायरी, केसरी, गोवा मानकूर वगैरे विविध जातींच्या आंब्याची आवक होत असल्यामुळे त्यांचे दर उतरून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
बेळगावचे होलसेल फ्रुट मार्केट हे कर्नाटकातील सर्वात मोठ्या फळांच्या बाजारपेठे पैकी एक मानले जाते. सध्या या मार्केटमध्ये सर्वत्र आवक झालेल्या आंब्याच्या पेट्या आणि बॉक्स रचून ठेवलेले पहावयास मिळत आहेत. या ठिकाणी गेल्या महिन्यात दीड महिन्यापूर्वी शहरात हापूस आंब्याची पहिली आवक झाली होती.
त्यावेळी आंबे महाग होते. मात्र सध्या होलसेल फ्रुट मार्केटमध्ये विविध जातींच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कोकणातील आंबे उत्पादकांकडून बेळगावच्या बाजारपेठेत हे विविध प्रकारचे आंबे येत असतात. त्यानंतर त्यांचा निलाव केला जातो.
या लिलावामध्ये शहर परिसर आणि जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी भाग घेतात. सध्या बेळगाव फ्रुट मार्केटमध्ये दररोज सकाळच्या प्रहरी आवक झालेल्या आंब्यांचा लिलाव चुरशीत पार पडताना दिसत आहे. आज बुधवारी सकाळी देखील मिळावा च्या ठिकाणी खरेददार व्यापाऱ्यांची एकच गर्दी झाली होती. फ्रुट मार्केटमध्ये महिना -दीड महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी बेळगावातील पहिला आंबा दाखल झाला होता त्या एम. बी. देसाई यांच्या दुकानात सध्या देवगड, वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी येथील आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना संदीप देसाई यांनी आवक वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी आंबा स्वस्त परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाला आहे. येत्या मे महिन्यापर्यंत बेळगावात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
आजच्या घडीला बेळगाव फ्रुट मार्केटमध्ये सर्व जातीचे आंबे आले आहेत. तसेच मागील वेळी मी सांगितल्याप्रमाणे आंब्याचा दर जवळपास अर्ध्या किमतीने उतरला आहे. त्यापैकी पूर्वी 2000 रुपये असलेल्या हापूस आंब्याचा दर आता प्रति डझन 500 ते 1500 रुपये झाला आहे. पायरी आंबा पूर्वी 1200 -1500 रुपये होता तो आता 500 ते 1000 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे पूर्वी 1000 ते 1200 रुपये इतका असलेला केसर आंबा दर सध्या 500 ते 800 रुपये झाला आहे. गोवा मानकूर 800 ते 1100 रुपये डझन असा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
येत्या कांही दिवसात हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे असे सांगून एम. बी. देसाई आणि सन्स या दुकानात सध्या ‘एसएमव्ही’ हा बेळगावातील सर्वात महागडा आणि सर्वोत्कृष्ट आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ऑरगॅनिक असलेला हा आंबा गेल्या 1 फेब्रुवारी बेळगाव दाखल झाला. त्यावेळी त्याची किंमत 3500 रुपये इतकी होती. आता हा दर 1500 ते 2000 रुपये इतका झाला आहे, अशी माहिती संदीप देसाई यांनी दिली.
एम बी देसाई यांच्याकडे ऑरगॅनिक हापूस मिळेल home delivery mob: 7204112318