बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पायदळी तुडवून पीकाऊ जमीनीत बेकायदेशीर तसेच बळजबरीने करण्यात येत असलेले हालगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे आणि तो रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी समस्त शेतकरी उद्या शनिवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लोटांगण आंदोलन छेडणार आहेत.
संतप्त शेतकऱ्यांकडून शहरातील वीर राणी कित्तूर चन्नमा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालत जावून निवेदन सादर करण्यात येणार आहे.
तेंव्हा हालगा-मच्छे बायपासमध्ये जमीन असलेले शेतकरी तसेच परिसरातील सर्व शेतकरी बंधू, शेतकरी संघटना, रयत संघटना, हितचिंतक, सामाजिक संस्था वगैरे सर्वांनी या आंदोलनात भाग घेऊन पाठिंबा द्यावा.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी हजर राहावे, असे जाहीर कळकळीचे आवाहन बायपासमधील शेतकरी बंधूनी केले आहे.