Sunday, January 5, 2025

/

पाक’समर्थक घोषणांबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसौधमध्ये झालेल्या पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी विरोधात विरोधक रस्त्यावर उतरले असून आज बेळगावमधील सांबरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना बसवराज बोम्मई म्हणाले, विधानसौधमध्ये पाक समर्थक घोषणा दिल्याचे प्रसारमाध्यमांमधून स्पष्ट झाले होते. मात्र याप्रकरणी मंत्री गद्दाराच्या बाजूने उभे राहिले.

काही मंत्रिमहोदयांनी आपली जबाबदारी विसरून देशद्रोह्यांची बाजू घेतली हे दुर्दैव आहे. मंत्र्यांनी घेतलेली हि भूमिका पाहता देशद्रोही कृती करणाऱ्यांपेक्षा अधिक चिंतेची बाब असल्याचे बोम्मई म्हणाले.

बसवराज बोम्मई पुढे म्हणाले, विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी केल्याचा एफएसएल अहवाल येऊन चार दिवस झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एनआयएने एफआयआर दाखल करून तिघांना अटक केली होती.Bommai

मात्र, अद्याप सरकार केवळ बेजबाबदारीने वक्तव्य करत असून याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडून पत्रकारांना लक्ष्य करण्यात येत आहे. एफएसएलच्या अहवालात पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आल्याचे म्हटले असून पाक समर्थक घोषणा देणाऱ्यांचा बचाव करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सध्या बेळगाव दौऱ्यावर आहेत. बेळगाव दौऱ्यादरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा होणार नसून यासंदर्भात दिल्ली येथे चर्चा होणार असल्याचे बोम्मई म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना मात्र बसवराज बोम्मई यांनी उत्तर देणे कटाक्षाने टाळले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.