Saturday, December 21, 2024

/

100 खाटांच्या ईएसआय हॉस्पिटलसाठी निविदा जारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील नव्या 100 खाटांच्या ईएसआय हॉस्पिटलच्या बांधकामासाठी निविदांच्या घोषणेसह बेळगावमधील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या योजना सुरू आहेत.

अशोकनगर येथील सध्याच्या 50 खाटांची सुविधा असलेल्या हॉस्पिटलला दुरूस्तीची नितांत गरज असली तरी त्याच हॉस्पिटलचे मोठ्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये परिवर्तन केले जाणार आहे.

सदर नव्या आधुनिक हॉस्पिटलच्या प्रकल्पाची अंदाजे किंमत 152.20 कोटी असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश समुदायासाठी वैद्यकीय सेवा वाढवणे आणि प्रदेशातील वाढत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करणे हा आहे.

बेळगावचे ईएसआयसी निधीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असून सध्या येथील ईएसआयसी कव्हरेज अंतर्गत 1,20,000 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत, ज्यात प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्रातील औद्योगिक कामगारांचा समावेश आहे.

हे कामगार संघटित उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच ईएसआयसी निधीमध्ये सातत्याने योगदान देतात, तसेच स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देतात. ईएसआय ईएसआयसी, राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आणि केंद्र सरकारद्वारे समर्थित, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना महत्त्वपूर्ण विमा संरक्षण प्रदान करते.

अपघात किंवा आजार झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देते. ही कायदेशीर तरतूद पुरेशा आरोग्य सेवेसाठी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते, त्यांचे कल्याण आणि सुस्थिती बाबतची बांधिलकीही दर्शवते.

दरम्यान, अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलची इमारत धोकादायक बनली आहे. गेल्या दोन वर्षापासून याच इमारतीत रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. हॉस्पिटलसाठी नवी जागा मिळत नसल्याने वणवण फिरण्याची वेळ ‘ईएसआय’वर आली होती.

यासाठी मच्छे व गणेशपूर येथील जागेचीही पाहणी झाली होती मात्र आता ईएसआयचे जुने हॉस्पिटल पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी मिळाली असून बांधकामाला लवकरच सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.